110 - An-Nasr ()

|

(1) १. जेव्हा अल्लाहतर्फे मदत आणि विजय प्राप्त होईल.

(2) २. आणि लोकांना तुम्ही अल्लाहच्या दीन (धर्मा) कडे समूहासमूहांनी येताना पाहाल.

(3) ३. तेव्हा आपल्या पालनकर्त्याची स्तुती प्रशंसेसह पवित्रता वर्णन करू लागा आणि त्याच्याजवळ क्षमा याचनेची प्रार्थना करीत राहा. निःसंशय, तो मोठा तौबा (क्षमा-याचना) कबूल करणारा आहे.