(1) १. शपथ आहे चाश्त (सूर्य वर आल्या) च्या वेळेची.
(2) २. आणि शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते.
(3) ३. ना तर तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला (एकटे) सोडले आहे, आणि ना तो तुमच्याशी बेजार झाला आहे.
(4) ४. निःसंशय, तुमच्यासाठी आरंभापेक्षा शेवट अधिक चांगला आहे.
(5) ५. तुम्हाला तुमचा पालनकर्ता फार लवकरच (इनाम) देईल आणि तुम्ही राजी (व खूश) व्हाल.
(6) ६. काय त्याने तुम्हाला अनाथ जाणून आश्रय दिला नाही?
(7) ७. आणि तुम्हाला, मार्ग विसरलेले पाहून मार्ग दाखविला नाही?
(8) ८. आणि तुम्हाला निर्धन असलेले पाहून श्रीमंत बनविले नाही?
(9) ९. तेव्हा अनाथावर तुम्हीही सक्ती (कठोरता) करू नका.
(10) १०. आणि ना याचना करणाऱ्याला दाटून दरडावून बोलू नका.
(11) ११. आणि आपल्या पालनकर्त्याच्या कृपा-देणग्यांचे वर्णन करीत राहा.