85 - Al-Burooj ()

|

(1) १. बुरुजांवाल्या आकाशाची शपथ.

(2) २. वायदा केलेल्या दिवसाची शपथ!

(3) ३. हजर होणाऱ्या आणि हजर केल्या गेलेल्याची शपथ!

(4) ४. (की) खंदकवाल्यांचा सर्वनाश केला गेला.

(5) ५. ती एक आग होती इंधनाची.

(6) ६. जेव्हा ते लोक तिच्या जवळपास बसले होते.

(7) ७. आणि ईमानधारकांशी जे करीत होते, ते आपल्या समोर पाहात होते.

(8) ८. हे लोक त्या ईमानधारकांच्या अन्य एखाद्या अपराधाचा सूड घेत नव्हते, याखेरीज की त्यांनी वर्चस्वशाली, सर्व प्रशंसेस पात्र अशा अल्लाहवर ईमान राखले होते.

(9) ९. ज्याच्यासाठी आकाश आणि धरतीचे साम्राज्य व राज्यसत्ता आहे आणि प्रत्येक वस्तू सर्वश्रेष्ठ अल्लाहसमोर आहे.

(10) १०. निःसंशय, ज्या लोकांनी ईमानधारक पुरुषांना व स्त्रियांना सताविले, मग माफीही मागितली नाही तर त्यांच्यासाठी जहन्नमची शिक्षा-यातना आहे आणि जळण्याची शिक्षा.

(11) ११. निःसंशय, ईमान कबूल करणाऱ्यांकरिता आणि सत्कर्म करणाऱ्यांकरिता त्या बागा आहे, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. हीच मोठी सफलता आहे.

(12) १२. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याची पकड मोठी सक्त आहे.

(13) १३. तोच पहिल्यांदा निर्माण करतो आणि तोच दुसऱ्यांदा जिवंत करील.

(14) १४. तो मोठा माफ करणारा आणि खूप स्नेह-प्रेम करणारा आहे.

(15) १५. अर्शचा स्वामी, अत्याधिक महानता राखणारा.

(16) १६. जे इच्छिल ते करून टाकणारा आहे.

(17) १७. काय तुम्हाला लष्करांची बातमीही मिळाली आहे?

(18) १८. (अर्थात) फिरऔन आणि समूदची.

(19) १९. खरे तर हे इन्कारी लोक खोटे ठरविण्याच्याच मागे लागले आहेत.

(20) २०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहनेही त्यांना सगळीकडून घेरले आहे.

(21) २१. किंबहुना हा कुरआन मोठी शान वैभव (प्रशंसा) राखणारा आहे.

(22) २२. ‘लोहे महफूज’मध्ये (लिहिलेला).