(1) १. कुरैशला आसक्ती मिळवून देण्याकरिता
(2) २. (अर्थात) त्यांना सर्दी व गरमीच्या प्रवासाची सवय लावून देण्याकरिता
(3) ३. त्यांनी (कृतज्ञता म्हणून) या घराच्या (काबागृहाच्या) स्वामीची उपासना करीत राहिले पाहिजे.
(4) ४. ज्याने त्यांना भुकेल्या अवस्थेत खायला दिले आणि भय-दहशतीच्या अवस्थेत शांती (सुरक्षा) प्रदान केली.