70 - Al-Ma'aarij ()

|

(1) १. एका मागणी करणाऱ्याने त्या अज़ाब (शिक्षा - यातने) ची मागणी केली जो घडून येणार आहे.

(2) २. काफिरांवर, ज्याला कोणी हटविणारा नाही.

(3) ३. या अल्लाहतर्फे, जो शिड्या बाळगणारा आहे.

(4) ४. ज्याच्याकडे फरिश्ते आणि आत्मा चढून जातात एका दिवसात, ज्याची मुदत पन्नास हजार वर्षांची आहे.

(5) ५. तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे धीर संयम राखा.

(6) ६. निःसंशय, हे त्या (अज़ाब) ला दूर समजतात.

(7) ७. आणि आम्ही त्याला जवळ असल्याचे पाहतो.

(8) ८. ज्या दिवशी आकाश वितळलेल्या धातूसारखे होईल.

(9) ९. आणि पर्वत रंगीत लोकरीसारखे होतील.

(10) १०. आणि कोणी मित्र कोणा मित्राला विचारणार नाही.

(11) ११. (जरी ते) एकमेकांना दाखविले जातील. अपराधी, त्या दिवसाच्या शिक्षा - यातनेच्या मोबदल्यात (दंड म्हणून) आपल्या पुत्रांना देऊ इच्छिल.

(12) १२. आपल्या पत्नीला आणि आपल्या भावाला.

(13) १३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते.
(१) अर्थात पूर्णतः ईमान राखणारे एकेश्वरवादी त्यांच्यात वर सांगितलेले वैगुण्य नसते. किंबहुना याच्या उलट ते सद्‌गुणांनी युक्त असतात. रोज नित्यनेमाने नमाज पढण्याचा अर्थ असा की ते नमाजबाबतच सुस्ती दिरंगाई करीत नाही. ते प्रत्येक नमाज तिच्या ठरलेल्या वेळेवर अगदी वक्तशीरपणे अदा करतात. कोणतेही काम त्यांना नमाजपासून रोखत नाही आणि जगाचा कोणताही लाभ त्यांना नमाज पढण्यापासून विमुख (गाफील) करीत नाही.

(14) १४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती मिळवून द्यावी.

(15) १५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची (आग) आहे.

(16) १६. जी (तोंडाची व डोक्याची) त्वचा सोलून काढणारी आहे.

(17) १७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे हटतो आणि विमुख होतो.

(18) १८. आणि गोळा (जमा) करून सांभाळून ठेवतो.

(19) १९. निःसंशय, मनुष्य मोठ्या कच्च्या हृदयाचा बनविला गेला आहे.

(20) २०. जेव्हा त्याला कष्ट - यातना पोहचते, तेव्हा भयचिंतीत होतो.

(21) २१. आणि जेव्हा त्याला सुख प्राप्त होते, कंजूसपणा करू लागतो.

(22) २२. परंतु ते नमाज पढणारे.

(23) २३. जे आपल्या नमाजचे वक्तशीर पालन करणारे आहेत.१

(24) २४. आणि ज्यांच्या धन-संपत्तीत निर्धारित हिस्सा आहे.

(25) २५. याचकांचाही आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचाही.

(26) २६. आणि जे न्यायाच्या दिवसावर विश्वास राखतात.

(27) २७. आणि जे आपल्या पालनकर्त्याच्या शिक्षेचे भय बाळगत राहतात.

(28) २८. निःसंशय, त्यांच्या पालनकर्त्याची शिक्षा यातना, निर्धास्त होण्याची बाब नाही.

(29) २९. आणि जे लोक आपल्या लज्जास्थानां (गुप्तांगां) चे (हराम कृत्यापासून) रक्षण करतात.

(30) ३०. पंरतु आपल्या पत्नींच्या आणि आपल्या दासींच्याखेरीज ज्यांचे ते मालक (स्वामी) आहेत, या बाबतीत ते निंदनीय नाहीत.

(31) ३१. आता जो कोणी याच्याखेरीज (मार्ग) शोधेल, तर असे लोक मर्यादेचे उल्लंघन करणारे ठरतील.

(32) ३२. आणि जे आपल्या अनामती (ठेवी) ची, आणि आपल्या वायद्या-वचनांची व प्रतिज्ञेची कास बाळगतात.

(33) ३३. आणि जे आपल्या साक्षींवर सरळ (आणि अटळ) राहतात.

(34) ३४. आणि जे आपल्या नमाजांचे संरक्षण करतात.

(35) ३५. हेच लोक जन्नतमध्ये मान - प्रतिष्ठा राखणारे असतील.

(36) ३६. तेव्हा, या काफिरांना झाले तरी काय की ते तुमच्याकडे धावत येतात.

(37) ३७. उजव्या आणि डाव्या बाजूने, समूहासमूहाने.

(38) ३८. काय त्यांच्यापैकी प्रत्येकजण असे इच्छितो की त्यांना देणग्यांनी युक्त (ऐश-आरामाच्या) जन्नतमध्ये प्रवेश लाभेल?

(39) ३९. (असे) कदापि होणार नाही. आम्ही त्यांना त्या (वस्तू) पासून निर्माण केले आहे, जिला ते जाणतात.

(40) ४०. तेव्हा मला शपथ आहे दोन्ही पूर्व आणि पश्चिम (दिशां) च्या पालनकर्त्याची की आम्ही निश्चतपणे समर्थ आहोत.

(41) ४१. या गोष्टीवर की त्यांच्याऐवजी त्यांच्यापेक्षा चांगले लोक आणावेत, आणि आम्ही लाचार विवश नाहीत.

(42) ४२. तेव्हा तुम्ही त्यांना भांडत-खेळत (असलेले) सोडा, येथे पर्यर्ंत की हे आपल्या त्या दिवसाला जाऊन मिळावेत, ज्याचा वायदा त्यांच्याशी केला जात आहे.

(43) ४३. ज्या दिवशी कबरीमधून हे धावत पळत बाहेर पडतील, जणू काही ते साध्य-चिन्हाकडे वेगाने जात आहेत.

(44) ४४. त्यांचे डोळे (नजरा) झुकलेले असतील, त्यांच्यावर अपमानाचे सावट (पसरलेले) असेल. हाच तो दिवस, ज्याचा त्यांच्याशी वायदा केला जात होता.