96 - Al-Alaq ()

|

(1) १. पठण करा आपल्या पालनकर्त्याच्या नावाने, ज्याने निर्माण केले.

(2) २. ज्याने मानवाला रक्ताच्या लोथड्या (गोळ्या) पासून निर्माण केले.

(3) ३. तुम्ही पठण करीत राहा तुमचा पालनकर्ता मोठा कृपाशील आहे.

(4) ४. ज्याने लेखणीद्वारे (ज्ञान) शिकविले

(5) ५. ज्याने माणसाला ते शिकविले, जे तो जाणत नव्हता.

(6) ६. खरोखर मनुष्य तर स्वतःवर काबू ठेवत नाही.

(7) ७. अशासाठी की तो स्वतःला निश्चिंत (किंवा श्रीमंत) समजतो.

(8) ८. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याकडेच परत जायचे आहे.

(9) ९. (बरे) त्यालाही तुम्ही पाहिले, जो (एका दासाला) रोखतो.

(10) १०. वास्तिवक तो दास नमाज अदा करतो.

(11) ११. आता तुम्हीच सांगा जर तो सन्मार्गावर असेल.

(12) १२. किंवा अल्लाहचे भय राखून वागण्याचा आदेश देत असेल.

(13) १३. बरे पाहा तर, जर हा खोटे ठरवित असेल आणि तोंड फिरवित असेल.

(14) १४. काय हा हे नाही जाणत की सर्वश्रेष्ठ अल्लाह त्याला चांगल्या प्रकारे पाहात आहे.

(15) १५. निश्चितच, जर त्याने आपले वाईट वर्तन सोडले नाही तर आम्ही त्याच्या माथ्यावरचे केस धरून त्याला फरफटत ओढू.

(16) १६. असा माथा जो खोटा व गुन्हेगार आहे.

(17) १७. त्याने आपल्या बैठकीतल्या लोकांना बोलावून घ्यावे.

(18) १८. आम्हीही जहन्नमच्या रक्षकांना बोलावून घेऊ.

(19) १९. खबरदार! त्याचे म्हणणे मुळीच मान्य करू नका आणि सजदा करा व (अल्लाहशी) निकट व्हा.