102 - At-Takaathur ()

|

(1) १. जास्तीत जास्त मिळविण्याच्या मोहाने तुम्हाला गाफील करून टाकले.

(2) २. येथेपर्यर्ंत की तुम्ही कब्रस्तानात जाऊन पोहोचले (दफन झाले).

(3) ३. मुळीच नाही, तुम्ही लवकरच जाणून घ्याल.

(4) ४. मुळीच नाही, तुम्हाला फार लवकर कळून येईल.

(5) ५. मुळीच नाही, जर तुम्ही खात्रीशीरपणे जाणून घ्याल.

(6) ६. तर निश्चितच तुम्ही जहन्नम जरूर पाहाल.

(7) ७. आणि तुम्ही तिला विश्वासाच्या डोळ्यांनी पाहाल.

(8) ८. मग त्या दिवशी तुम्हाला निश्चितपणे कृपा देणग्यांबाबत विचारले जाईल.