111 - Al-Masad ()

|

(1) १. अबु लहबचे दोन्ही हात तुटले आणि तो (स्वतः) नष्ट झाला.

(2) २. ना तर त्याची संपत्ती त्याच्या कामी आली आणि ना त्याची कमाई.

(3) ३. लवकरच तो भडकणाऱ्या आगीत जाऊन पडेल.

(4) ४. आणि त्याची पत्नीही (जाईल), जी लाकडे वाहून नेणारी आहे.

(5) ५. तिच्या गळ्यात खजुरीच्या सालीचा पीळ घातलेला दोरखंड असेल.