(1) १. काय तुम्हालाही, झाकून टाकणाऱ्या (कयामत) ची वार्ता पोहचली आहे?
(2) २. त्या दिवशी बहुतेक चेहरे अपमानित असतील.
(3) ३. (आणि) दुःखांनी पीडित कष्ट - यातनाग्रस्त असतील.
(4) ४. ते धगधगत्या आगीत जाऊन पडतील.
(5) ५. आणि अतिशय उष्ण झऱ्याचे पाणी त्यांना पाजले जाईल.
(6) ६. त्यांच्यासाठी काटेदार झाडांखेरीज आणखी काही खायला नसेल.
(7) ७. जे ना त्यांना धष्ट पुष्ट करील, ना त्यांची भूक मिटवील.
(8) ८. बहुतेक चेहरे त्या दिवशी प्रफुल्ल टवटवीत आणि (सुसंपन्न स्थितीत) असतील.
(9) ९. आपल्या कर्मांमुळे आनंदित असतील.
(10) १०. उच्च (प्रतीच्या) जन्नतींमध्ये असतील.
(11) ११. जिथे कोणतीही असभ्य निरर्थक गोष्ट ऐकणार नाहीत.
(12) १२. जिथे (शीतल) झरे वाहत असतील.
(13) १३. (आणि) त्या (जन्नतीं) मध्ये उंच उंच आसने असतील.
(14) १४. आणि प्याले ठेवलेले (असतील).
(15) १५. आणि एका रांगेत लावलेले तक्के असतील.
(16) १६. आणि मऊ मखमली गालिचे पसरलेले असतील.
(17) १७. काय हे उंटाकडे नाही पाहत की त्यांना कशा प्रकारे निर्माण केले गेले आहे?
(18) १८. आणि आकाशांना की कशा प्रकारे उंच केले गेले आहे.
(19) १९. आणि पर्वतांकडे, की कशा प्रकारे गाडले गेले आहेत.
(20) २०. आणि जमिनीकडे की कशा प्रकारे ती बिछविली गेली आहे.
(21) २१. तर तुम्ही उपदेश करीत राहा (कारण) तुम्ही फक्त उपदेश करणारे आहात.
(22) २२. तुम्ही काही यांच्यावर देखरेख ठेवणारे नाहीत.
(23) २३. परंतु जो मनुष्य तोंड फिरवील आणि इन्कार करील.
(24) २४. त्याला सर्वश्रेष्ठ अल्लाह फार मोठा अज़ाब (शिक्षा - यातना) देईल.
(25) २५. निःसंशय, त्यांना तर आमच्याचकडे परतायचे आहे.
(26) २६. निःसंशय, त्यांचा हिशोब घेण्याची जबाबदारी आमची आहे.