97 - Al-Qadr ()

|

(1) १. निःसंशय, आम्ही या (कुरआना) ला कद्र (बरकती) च्या रात्री अवतरित केले.

(2) २. तुम्हाला काय माहीत की कद्रची रात्र काय आहे?

(3) ३. कद्रची रात्र एक हजार महिन्यांपेक्षा उत्तम आहे.

(4) ४. या रात्री (प्रत्येक कार्य पार पाडण्यास) आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने फरिश्ते आणि रुह (जिब्रील) अवतरित होतात.

(5) ५. ही रात्र पूर्णपणे सलामतीची असते आणि प्रातःकाळाचा उदय (पहाट) होईपर्यंत असते.